Showing: 1 - 10 of 10 RESULTS

विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलचे दुहेरी यश

🏆विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलचे दुहेरी यश🏆

आपल्या विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलचा विद्यार्थी शौर्य नितीन भोंडवे वय ११ वर्षे (इयत्ता ६ वी) याने अहिल्यानगर येथील अखिल भारतीय नरेंद्र फिरोदिया चषक २०२६ स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक मिळवून ₹ १,००,००० (एक लाख रुपये) चे पारितोषिक पटकाविले आहे.

तसेच
अनुष्का बापु कुतवळ (इयत्ता १२ वी) सध्या 15 ते 25 जुलै 2026 या कालावधीत चीन (Shenzhen) येथे सुरू असलेल्या अठरा वर्षाखालील 28 व्या आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेत खेळत आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल शौर्य आणि अनुष्का यांचे पालक, प्रशिक्षक आणि सर्व मार्गदर्शकांचे मनःपूर्वक अभिनंदन !

Refining the Art of Strategy: Our Recent Milestone in Chess

सुपे परगण्याची कन्या आणि आमच्या विद्या प्रतिष्ठान सुपे स्कूलची विद्यार्थिनी अनुष्का बापू कुतवळ हिची श्रीलंका येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ मधील बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड. ग्रामीण भागातून तयार झालेला अस्सल हिरा म्हणजे अनुष्का कुतवळला पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा.

Achievement in Sports

विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या आंतरशालेय खो – खो स्पर्धेत सुपे इंग्लिश मीडियम स्कूलचे 05 संघ उपविजेते ठरलेले आहेत .
शाळेच्या खो – खो संघातील सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन🌹🌹

विद्या प्रतिष्ठान संस्थेअंतर्गत आयोजित आंतरशालेय खो – खो स्पर्धा दिनांक 13 डिसेंबर 2025 मध्ये आपल्या विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत खालीलप्रमाणे यश संपादन केले आहे.

मुली १४ वयोगट – द्वितीय क्रमांक

मुले १४ वयोगट – द्वितीय क्रमांक

मुली १७ वयोगट – द्वितीय क्रमांक

मुले १७ वयोगट – द्वितीय क्रमांक

मुली १९ वयोगट – द्वितीय क्रमांक              या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व विजेत्या खेळाडूंचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद यांच्याकडून हार्दिक अभिनंदन.