🏆 *क्रीडा क्षेत्रात विद्या प्रतिष्ठान सुपेची दमदार कामगिरी; चार विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड*
जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत U-19 मुलांच्या गटात शाळेच्या रुद्र संतोष तरटे (इयत्ता ८ वी, ब) याने उत्कृष्ट कामगिरी करत क्वाड स्केटिंग प्रकारात तीन सुवर्णपदके मिळविली. तसेच शिवतेज प्रदीप चांदगुडे (इयत्ता ६वी, ब) याने इनलाईन स्केटिंग प्रकारात तीन सुवर्णपदके व एक रौप्यपदक पटकावले. तसेच तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत शाळेच्या अनुष्का बापू कुतवळ (इयत्ता १२ वी) हिने U-19 मुलींच्या गटात प्रथम क्रमांक व शौर्य नितीन भोंडवे याने U-14 मुलांच्या गटात प्रथम क्रमांक मिळविला.










